
कलिंगड पिकावरील कीड व त्यावरील उपाययोजना
1)नागअळी
या किडीची अळी लहान तपकिरी रंगाची पिवळसर असून कोष तांबूस रंगाचा असतो मादी पानावर छिद्र पाडून पांढरी अंडी टाकते अंड्यातून अळी बाहेर पडण्यास एक-दोन दिवस लागतात किडीची वाढ होण्यास पाच ते दहा दिवस लागतात आणि पाण्यातून बाहेर पडून जमिनीत कोषावस्थेत जाते.ही कोषावस्था जवळपास दहा ते बारा दिवस राहते अशाप्रकारे किडीचा जीवनक्रम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होतो
पोषक वातावरण –
वातावरणातील आद्रतेचे प्रमाण ६५ ते ७० % हे चार तासांपेक्षा जास्त काळ असणे या अळीच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरते .
लक्षणे –
याचा प्रादुर्भाव रोपे लहान असताना दमट हवामानात कोवळ्या पानावर होतो .ही अळी पानाच्या आत राहून वेलीचे पान पोखरते व अन्नद्रव्ये आणि हरीतद्रव्ये खाते ,त्यामुळे पानावर नागमोडी ,पिवळट ,जाड रेषा दिसतात व पांढरे चट्टे पडतात .या किडीच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळी पडून गळतात व कालांतराने झाड सुकते . फळांचे पोषण होत नाही . फळे वेडीवाकडी होऊन मागणी कमी होती .
उपाय-
एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करताना पिवळे चिकट सापळे, गंध सापळे , प्रकाश सापळे (लाईटट्रॅप) अशा तीन सापळ्यांचा प्रयोग शिफारसीप्रमाणे करावा. पीक ३, ४ पानांच्या अवस्थेतेत असताना नियंत्रणासाठी निंबोळी अर्क @३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
2)पांढरी माशी
पांढऱ्या माशीची अंडी किंवा पिल्ले हे वेलाच्या पानाच्या खालच्या बाजूस असतात पांढऱ्या माशीची पिल्ले ही पिवळसर आणि अतिशय सूक्ष्म असतात. ही सामान्यतः डोळ्यांनी दिसत नाहीत.एक पूर्ण वाढ झालेली पांढरीमाशी मात्र डोळ्यांनी पूर्णपणे दिसू शकते पांढरी माशी या किडीच्या जीवनक्रम पिल्ले अंडी, कोश, आणि प्रौढ अवस्था असतात . ही पानांच्यामागील बाजूस अंडी घालत असल्यामुळे ते अंडी सहज दिसत नाहीत आणि मादी साधारण 100 अंडी एकाच वेळी देते .या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास मात्र चार ते पाच दिवसाचा कालावधी निश्चित लागतो. आणि पिल्लांची पूर्णपणे वाढ होण्यास दहा ते चौदा दिवसांचा कालावधी लागतो. अशाप्रकारे पानाच्या मागील बाजूस या किडीच्या अनेक पिढ्या तयार होतात.
होणारे नुकसान-
पांढरी माशी अनेक विषानुजन्य रोगांचा प्रसार करते .12 दिवसानंतर या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते.प्रौढ पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात व पाने व फुलांतील रस शोषतात.त्यामुळे फुले गळतात. या किडीमधून एक चिकट द्रव स्रवतो, त्यावर बुरशी वाढते.या किडीच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.
उपाय-
- चिकट सापळ्यांचा वापर करणे
- कीड लागलेली फळे नष्ट करावे
३)फुलकिडे –
सर्व प्रकारच्या किडी मध्ये फुलकिडे ही एक महत्त्वाची कीड आहे कारण प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा या किडी कीटकापासून होणाऱ्या विषाणूजन्य किडीमुळे जास्त नुकसान होते ही कीड सूक्ष्म म्हणजे सर्वसाधारणपणे एक मिलीमीटर लांबीचे पिवळसर रंगाची असते व ते पानावर दिसून येते या कीटकाच्या जीवनक्रमात अंडी ,पिल्ले ,कोश आणि प्रौढ अवस्था असतात .यांची पिल्ले बाहेर पडण्यास पाच ते दहा दिवस लागतात किल्ले पांढरट पिवळसर असून ते पानांवर आढळतात पिल्ल आठ ते पंधरा दिवस राहते त्यानंतर ते कोषावस्थेत जमिनीत जातात कोषावस्था चार ते सात दिवस राहते तर रोड अवस्थेतून ते बाहेर पडतात.
होणारे नुकसान-
पिल्ले आणि प्रौढ फुलकिडे पानातील,फुलातील परागकण,,कळी,फळ खरावडून त्यातील रस शोषून घेतात .त्यामुळे पाने वाकडी होतात .त्याच बरोबर हे कीटक स्पॉटेड वील्ट किंवा करपा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त होत असतो
उपाय-
- चिकट सापळ्यांचा वापर करणे
- पिकांची फेरपालट करणे
4 .फळमाशी
ही कीड कारले, कलिंगड, खरबूज, काकडी इतर पिकांमध्ये शक्यतो आढळून येते या किळीच्या जीवनक्रमात अंडी अळी कोश आणि पतंग अशा चार अवस्था आहेत यामध्ये पिकास हानिकारक असनारे पतंग पांढरी अंडी पानावर ,ळाच्या सालीमध्ये किंवा पानाखाली घालतात अंड्यातून बाहेर पडणारी अळीही फिकट हिरवी असते.पूर्ण वाढलेली अळी हिरवी असून पाठीवर पांढरे पट्टे असतात तसेच ही अळी पानावर किंवा फळावर शक्यतो दिसून येते किडीचे कोष तपकिरी असून ते पानाखाली सापडतात पतंग पांढरे असून पंखाच्या कडा ह्या काळ्या असतात. व शेपटीला नारंगी गोंडा असतो ही पतंग रात्री कार्यरत असतात.
पोषक वातावरण-
या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ परंतु पाऊस नससतांना कोरड्या हवामानात जास्त होतो तसेच उन्हाळ्यातही प्रादुर्भाव दिसून येतो परंतु तापमानात वाढ झाल्यास किडीचे प्रमाण घटते.
होणारे नुकसान-
ही पाणे खाते त्यामुळे वेलीवर पाणे शिल्लक राहतच नाहीत त्याचबरोबर ती फळात प्रवेश करून फळाचे नुकसान सुद्धा करते.अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात.त्यामुळे फळे कुजतात व त्याचा घाणेरडा वास येतो
या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ परंतु पाऊस नससतांना कोरड्या हवामानात जास्त होतो तसेच उन्हाळ्यातही प्रादुर्भाव दिसून येतो परंतु तापमानात वाढ झाल्यास किडीचे प्रमाण घटते.
उपाय-
- trap चा वापर करणे
- कीड लागलेली फळे नष्ट करावे