द्राक्ष नोंदवही २०२३-२४

October 28, 2023

द्राक्ष नोंदवही २०२३-२४

नमस्कार शेतकरी बांधवांनो, फ्रुटवाला बागायतदार प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो फ्रुटवाला बागायतदार गेल्या चार वर्षांपासून सतत आपल्या संपर्कात राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या मार्गदर्शन करत आहे. नुकतीचं फ्रुटवाला बागायतदार ची २०२३-२४ द्राक्ष नोंदवही ची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक मधील शेतकरी देखील या नोंदवहीचा वापर करत आहेत. द्राक्ष बागेतील दैनंदिन कामांची नोंद ठेवणे या मुळे अतिशय सोपे झाले आहे. द्राक्ष नोंदवहीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अविरत श्रमाचे फळ,वेलींचे संगोपन करण्यात, मातीचे संगोपन करण्यात आणि द्राक्ष शेतीकला शिकायला मिळेल.
तुम्ही या द्राक्ष नोंदवहीच्या पानांवर तुम्हाला आलेल्या अडचणी, रोजचा खर्च, औषध फवारणी, पाणी देण्याची वेळ सर्व बारीक-बारीक गोष्टी नोंद करून ठेवू शकता.
गेल्या वर्षी बागेसाठी कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला याची सर्व नोंद शेतकरी मित्रांनो तुम्ही एका वहीमध्ये आता लिहू शकता. तुमच्या द्राक्ष शेतीचा तुम्हीच डॉक्टर बनण्याचा अनुभव तुम्ही या नोंदवही च्या माध्यमातून घ्याल. नोंदी सोबतच बऱ्याच द्राक्ष शेती तज्ञ् शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देखील यामध्ये आहे.

द्राक्ष नोंदवही का वापरावी ?
• द्राक्ष बागेतील अचूक हिशोब मांडून ठेवण्याची सवय लागते त्यामुळे आर्थिक ताळेबंदी सांभाळता येते.
• मागील वर्षी बागेची छाटणी कधी झाली यावेळी कधी होणार हे अचूक लक्षात येणार.
• कोणते औषध फवारले, कोणती खते दिली, त्याचा पिकावर काय परिणाम झाला याची संपूर्ण माहिती ठेवता येते.
• द्राक्ष नोंदवहीमुळे कोणत्या दिवशी, कोणत्या स्टेज ला कोणते स्प्रे व फर्टिगेशन घेतले आणि किती खर्च झाला याची नोंद ठेवता येते.
• मागील वर्षीच्या नोंदी ठेवल्यामुळे त्या अनुभवावरून रोग येण्यापूर्वीच काही बुरशी नाशके घेता येतात.

द्राक्ष नोंदवही वापरल्याने फायदे –

• द्राक्ष बागेतील स्टेज नुसार औषध फवारणी कोणत्या वेळी करावी हे समजते.
• चालू हंगामात पाठीमागच्या हंगामा पेक्षा काय बदल करता येतोय का हे नोंदवहीमुळे लक्षात येते.
• द्राक्ष नोंदवहीमुळे रेसेङ्यू मॅनेजमेंट समजण्यास अधिक सोपे होते.
• जुन्या नोंदी पाहून मागील वर्षी काय प्रॉब्लेम आले आणि त्यावर त्यावेळी काय उपाय योजना केल्या हे लगेच लक्षात येते त्यामुळे जुन्या अनुभवावरून यावेळी योग्य निर्णय घेणे सोपे जाते.
• कृषी रसायनांचा योग्य वापर कसा करावा हे लक्षात येते.
• द्राक्षामध्ये वापरण्यास केंद्रीय कीडनाशक मंडळाची शिफारस असलेल्या कीडनाशकांची यादी यामध्ये आहे.