
द्राक्ष सूचना
छाटणी पूर्व नियोजन –
१.पानगळ करून घेणे – (इथरेल छाटणी अगोदर किमान 20 दिवस आधी फवारणे.)
२.वापसा स्थिती ठेवणे.
३. तण नियंत्रण करून घेणे.
४.यंत्र सामुग्री अद्यावत करून घेणे.
५. योग्य पाणी व्यवस्थापण साठी – ड्रीपर्स चेक करणे.
6. बेसल डोस छाटणी अगोदर 8-10 दिवस देणे.
छाटणी –
१.मजुरांचे व्यवस्थापन करणे.
२.अपेक्षित डोळा ठेवून एकसारखी छाटणी करणे.
३.स्प्राउटिंग साठी हायड्रोजन सायनामाईड व्यवस्थितपणे लावणे.
४.उडद्या किड , मिलिबग किड, खोड किडी यांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष्य देणे.पोंगा स्टेज-
पोंगा स्टेज
१.पोंगा स्टेज साधारण 8-11 दिवसामध्ये येते.
(वाण आणि हंगाम यानुसार दिवसांत बदल होईल.)
२.वापसा स्थिती सांभाळणे गरजेचे आहे.
३.अतिरिक्त PGR चा वापर टाळणे.
४.फवारणी करताना कव्हरेज कडे लक्ष्य देणे.
फेलफुट काढणे-
१.फेलफुट काढणे ही स्टेज साधारण 14-17 दिवसामध्ये येते.
२.3-5 पानाची अवस्था असावी.
३.घडांची संख्या व काडींची संख्या मर्यादित करणे.
4. पाऊस सुरू असताना फेलफूट काढू नये.
प्रीब्लूम अवस्था-
१.घडाचा आकार व पाकळीतील अंतर अपेक्षित ठेवण्यासाठी योग्य PGR व्यवस्थापन करणे.
२.डाउनी रोग , थ्रीप्स , किड व अळी यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
३.कॅल्शियम व्यवस्थापनावर लक्ष्य देणे..
दोडा अवस्था –
१.या अवस्थेत अंडी गळ होत असते.
२.अपेक्षित कॅनोपी नुसार शेंडा stop करून घेणे.
(घडा पुढे किमान 10-12 पाने आवश्यक आहेत.)
फ्लॉवरिंग-
१.फ्लॉवरिंग स्टेज साठी32-45 दिवस साधारण लागतात.
(वाण, हंगामानुसार बदल होतो)
२.थ्रीप्स सारख्या किडींचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
३.भुरी डाऊनी वर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .
४.एकसमान फ्लॉवरिंग सेटिंग साठी प्रयत्न करणे.
५.नैसर्गिकरीत्या मणी गळ होऊन देणे.(थीनींग करता येते)
६.पाण्याचा अतिरिक्त ताण देऊ नये.
पान – देठ परीक्षण करण्याची योग्य वेळ
बेरी सेटिंग/ development स्टेज (45-55 दिवस)
१.योग्य पाणी व्यवस्थापन करणे.
२.GA ॲप्लिकेशन चे योग्य व्यवस्थापन करणे
थीनिंग
१.घडांची संख्या व मण्यांची संख्या यांचे गुणोत्तर ठरउन संख्या मर्यादीत करणे.
२ थिनिंग करताना धारदार निर्जंतुकीकरण केलेली कात्री वापरावी.
३.कुशल मजुरांचा वापर करणे
(पाऊस असताना थिनींग करू नये
बेरी devlopment (55-7 0दिवस
१.पान देठ परीक्षणनुसार बँलन्स न्यूट्रीशन करावे.
२.गरजेनुसार जमिनी मध्ये बेसल डोस/ दाणेदार खत व्यवस्थापन करावे.
३.पाण्याची गरज वाढलेली असते त्यामूळे पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
४. पालाश व स्फुरद उपलब्धतेवर विशेष लक्ष देणे.
५.या दरम्यान PGR चा अतिरिक्त वापर टाळावा.
Voriosn स्टेज. ( मन्यामध्ये पाणी उतरणे )
1. कमी किंवा जास्त पाण्याचा ताण निर्माण होऊ देऊ नये.
2. यादरम्यान sunburnig किंवा उकड्या सारखी समस्या येऊ नये म्हणून अतिरिक्त PGR चा वापर करू नये.
3. पान देठ परीक्षण करण्यासाठी योग्य वेळ.
Maturity/ पक्वता
१.मिलिबग, रेड माईट यांवर लक्ष्य देणे.
२.रसरशीत गोल तजेलदार द्राक्ष तयार करणे.
एप्रिल छाटणी नियोजन
१. द्राक्ष वेलीला पुरेशी विश्रांती देऊन नवीन हंगामासाठी एप्रिल छाटणी (खरड छाटणी)चे नियोजन करावे.
२. विश्रांती च्या काळात बागेमधील माती परीक्षण करून घ्यावे.
३.माती परीक्षणानुसार सेंद्रिय खते, रासायनिक खते यांचे नियोजन करावे.