कलिंगड पिकावरील रोग व त्यावरील उपाययोजना

September 30, 2023

1)मर –

पोषक वातावरण –

55-21 दिवसांनंतर फ्युजारियम बुरशी मुळे मर रोग दिसून येतो . वेलीवर येणाऱ्या ताणामुळे( फळ पक्वता अवस्था) पाण्याचा अतिवापर ,उबदार ,ओलसर वातावरण या कारणांमुळे मर रोग कलिंगड पिकावर येत असतो .

लक्षणे –

रोगाची बुरशी पिकाच्या मुळात शिरून पिकाची रसवाहिनी बंद होते ज्यामुळे पाने पिवळी पडणे, फूल गल होणे, वेल निस्तेज होऊन मरणे , रोगग्रस्थ खोडाचा मधोमध उभा काप घेतल्यास खोडाच्या लांबीला समांतर तपकिरी रंगाची रेख (उतीचा थर )दिसने ही मर रोगाची लक्षणे आहेत . योग्य वेळेवर लक्ष्य नाही दिले तर संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते.

उपाययोजना -वेळोवेळी बुरशीनाशकाची स्लरी वापरणे ,पाण्याचा अतिवापर टाळणे,मर रोगाला प्रतिबंधात्मक वाण लागवडीसाठी वापरणे.

2)केवडा( Downey mildew )

.पोषक वातावरण –

दमट हवामान ,जास्त आद्रता ,ढगाळ वातावरण ,पाण्याचा कमी निचरा यामुळे केवडा ह्या बुरशिजन्य रोगाची वाढ खूप जोमाने होते

.लक्षणे –

पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके सुरवातीला दिसतात.पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही. परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

.उपाययोजना –

  • बुरशीनाशकाची फवारणी करणे
  • प्रसारित पाने, फांद्या नष्ट करणे 

3)भुरी

 पोषक वातावरण –

५० % पेक्षा आद्रता,कमी तापमान ,जमिनीमध्ये नत्र युक्त खतांचा अतिवापर,कमी पाण्याचा निचरा ,नवीन स्पोअर्स तयार होणे आणि त्यांच्या वहनासाठी कोरडे हवामान पोषक ठरते .

लक्षणे-

पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.प्रमाण वाढल्यास पाने पिवळी पडून गळतात . फळ धारणेनंतर  रोगाची लागण जास्त प्रमाणात होते  .

उपापयोजना –

पोषक वातावरण असताना एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करून दर ७ ते १० दिवसांनी नियमित फवारणी घ्यावी . पानांच्या खालून फवारणी होईल अश्या पद्धतीने फवारणी करावी . उत्तम प्रतिच्या नोझलचा वापर करणे . रोगाची लागण आणि लक्षणे यातील फरक हा केवळ ३ ते ७ दिवसांचा असल्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे .पिकातील पालाश ची मात्रा योग्य राखावी .प्रसारित पाने, फांद्या नष्ट करावीत .