Chemical Fertilizer
रासायनिक खतांच्या किंमती खूप जास्त वाढलेल्या आहेत आणि अजून ही वाढीचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कसा कमी करायचा? यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.
खतांचे नियोजन करत असताना ते योग्य प्रमाणात आणि कमी खर्चात कसे होईल? हे पाहावे लागेल यासाठी काही मुद्दे विचारात घेणे गरजेचे ठरतील.
✅पिकांचे अन्न हे खत नसून त्यातील उपलब्ध असलेले घटक हे आहेत हे समजून घ्यावे लागतील.
✅माती परीक्षण, पान देठ परीक्षण, पाणी परीक्षण यावरूनच नियोजन करावे लागेल.
✅जमिनीचे की पिकाचे पोषण करायचे आहे ते ठरवावे लागेल.
✅पाणी व त्याची गुणवत्ता आणि त्याचे योग्य व्यवस्थापन.
✅जिवाणू खते त्यांचा कार्यक्षम वापर आणि त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे.
✅ संतुलित पोषण (Balance Nutrition) हे समजून घेतले पाहिजे.
✅जमिनीचा सामू सोडून इतर गोष्टी, EC, सेंद्रिय कर्ब, चुनखडक, ई. आहेत आणि त्यापण महत्वाच्या आहेत हे समजून घेतले पाहिजे.
✅ इम्पोर्टेड, चीलटेड, नॅनो, स्पेशालिटी ई. खाताना विशेषणे आल्यानंतर ती खूपच भारी असतात मग ती कितीही महाग असुदेत हा गैरसमज दूर केला पाहिजे.
✅सर्वात महत्वाचे आपल्या पिकाचे आपल्या जमिनीत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यात सर्वोत्तम पीक घ्यायचे आसेल तर त्याचे परफेक्ट नियोजन आपणच करू शकतो हा विश्वास पाहिजे. त्यासाठी नोंदी ठेवणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्यानुसार तज्ञांचा सल्ला घेणे.
नाहीतर वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती या देखील मार्केट मधील खूप लोकांना संधी निर्माण करणारी आहे आणि ते त्यांचे निकृष्ट दर्जाची उत्पादने शेतकऱ्यांच्या गळ्यात घालणारचं आहेत.
वरील सर्व मुद्यांवर सविस्तर माहिती पुढे देतच राहील..
– गणेश नाझीरकर, फ्रुटवाला बागायतदार