Soil Testing

August 8, 2023

🍇 द्राक्ष बाग सल्ला 🍇

द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी (खरड छाटणी) याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पुढील येणाऱ्या हंगामात यशस्वी उत्पादन घ्यायचे असेल तर एप्रिल छाटणीमध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हार्मोन्स व्यवस्थापन, रोग व किड व्यवस्थापन, कॅनापी व्यवस्थापन, सूर्यप्रकाश आणि इतर अनेक गोष्टी या खूप महत्त्वाच्या आणि काटेकोरपणे होणे अतिशय आवश्यक आहे.

 

१. खत व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. याच हंगामात माती परीक्षण करणे फायद्याचे ठरते.

२ माती परीक्षणासाठी योग्य पद्धतीने बागेतून मातीचा नमुना घेणे गरजेचे असते.

३. बागेतून घेतलेला नमुना योग्य लॅबमध्ये पाठून त्याचा रिपोर्ट मिळवणे.

४. मिळालेल्या रिपोर्टनुसार तज्ञाशी सल्लामसलत करून योग्य खताचे नियोजन करणे गरजेचे असते.

 

➡️ माती परीक्षणामध्ये काय तपासले पाहिजे? 

✅ pH 

✅ EC

✅ सेंद्रिय कर्ब

✅ चुनखडक

✅ नत्र 

✅ स्पुरद 

✅ पालाश 

✅ कॅल्शिअम 

✅ मॅग्नेशियम  

✅ गंधक 

✅ बोरॉन 

✅ झिंक

✅ फेरस

✅ मँगॅनीज 

✅ मॉलि्बडेनम 

✅ कॉपर

✅ सोडियम क्लोराईड क्षार

✅ कार्बोनेट, बाय कार्बोनेट

✅ पाणीधारण क्षमता (WHC)

 

👉🏻 माती परीक्षण करण्यासाठी Fruitwala bagayatdar टीमशी 

👉🏻 थेट संपर्क करू शकता – 7020197622

 

– गणेश नाझीरकर, फ्रुटवाला बागायतदार

बुधवार, २० एप्रिल २०२२