Tomato Virus

August 8, 2023

📣 🍅 टोमॅटोची रोपे निवडताना टूटा आणि व्हायरसची रिस्क घेताय? 

सध्या टोमॅटोची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसतो आहे, याचे एक मुख्य कारण असेही सांगता येईल की टोमॅटोचे वाढत असलेले दर. 

आता घाईघाईत लागवड करताना काही शेतकरी मित्र टोमॅटोची रोपे बुकिंग न करता थेट नर्सरीतून रोप मागवत आहेत. 

मला काल एका तरुण शेतकऱ्याने व्हॉट्सॲपवरती टोमॅटोचे रोप व्यवस्थित आहे का? हे पाहण्यासाठी टोमॅटोचे काही फोटो पाठवले आणि सांगितले की हे रोप माझ्या शेतात पोहचली आहेत आणि उद्यापासून मी लागवड करणार आहे तर ते फोटो पाहिले असता त्या रोपा वरती टुटा नागअळी प्रादुर्भाव दिसून आला. 

टोमॅटोवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे आणि काही केल्या तो आटोक्यात येत नाही आणि हाच टूटा नर्सरी स्टेजलाच आपल्या रोपांवरती असेल तर मालं काढेपर्यंत येवढं त्रास देईल की त्यातून उत्पादन निघण्याची शक्यता खूप कमी होईल. 

काही ठिकाणी या रोपावराती पिवळे डाग दिसत आहेत मग ते डाऊनीचे आहेत की सी. एम.व्ही. चे आहेत हे सांगता येत नाही. तर अशी इन्फेक्टेड रोप आपण नर्सरीमधून घेऊ नये.

व्यवस्थित पद्धतीने टोमॅटो रोपांची बुकिंग करा, बुकिंग केल्यावर चांगल्या प्रतीची रोप मिळवण्याचा प्रयत्न करा आणि वारंवार जाऊन नर्सरी प्लॉटची पाहणी करा. 

सशक्त आणि योग्य रोपे हवे असल्यास फ्रुटवाला बागायतदार टीमशी ऑनलाईन नर्सरीसाठी थेट संपर्क करा आणि निरोगी रोपे मिळवा..

 

– गणेश नाझीरकर, फ्रुटवाला बागायतदार

 

🌳 फ्रुटवाला बागायतदार ऑनलाईन नर्सरी संपर्क – 👇

70201 97622