टोमॅटो पीक शेतकरी संवाद यात्रा-संगमनेर
एक अनोखे चर्चा सत्र!!! टोमॅटो मध्ये काम करणारे सर्वं घटक एकाच ठिकाणी एकत्र!! विद्यापीठ मधील शाश्त्रज्ञ, निविष्टा पुरवणारे कंपनी प्रतिनिधी, दुकानदार, नर्सरी चालक, व्यापारी,शेतकरी, #agristartup हे सर्वं टोमॅटो च्या शिवारात एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून भविष्यातील टोमॅटो शेतीवर संवाद साधतात. यामुळे नक्कीच कृषी क्षेत्रात क्रांती घडणार आहे. या आधुनिक कृषी माहिती विस्तार क्रांती ची सुरुवात फ्रुटवाला बागायतदार च्या माध्यमातून होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. 🙏 🍅टोमॅटो 🍅टोमॅटो 🍅टोमॅटो कै. कारभारी दादा गीते शिवार प्रतिष्ठान आणि Fruitwala bagayatdar यांचा वतीने घेण्यात आलेला गीते परिवार यांचा 25 एकर टोमॅटो प्लॉट वर आयोजित टोमॅटो वरील चर्चा सत्रात 250 वर शेतकरी वर्ग उपस्थित होता. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी 25 एकर टोमॅटो चे नियोजन पाहून खुश झाले, खूप साऱ्या गोष्टींची देवाण घेवाण झाली. बांधावर घेण्यात आलेले कार्यक्रम नक्कीच सर्वांसाठी फायदेशीर ठरतात. उपस्थित सर्वांसाठी गीते परिवाराचा वतीने उत्तम नियोजन केले होते. टोमॅटो मध्ये माहितीपर सर्व काही एका छताखाली आयोजित करण्याचा आनंद वेगळाच.