टोमॅटो क्षेत्र भेटी व टोमॅटो पीक चर्चा सत्र
July 14, 2023
🍅टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद. शेतकऱ्याच्या बांधा पर्यंत कृषी माहिती पोचवणे गरजेचे आहेत आणि ते काम फ्रुटवाला बागायतदार टीम कित्येक वर्षांपासून करत आहे. मोडनिंब ता. माढा जी सोलापूर या ठिकाणी दोन दिवसीय टोमॅटो क्षेत्र भेटी व टोमॅटो पीक चर्चा सत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमात टोमॅटो चे अन्नद्रव्य व्यवस्थापण, रोग व कीड व्यवस्थापण टोमॅटो चे सध्याचे बाजारभाव आणि पुढील स्थिती, टोमॅटो लागवडी मधील काम करण्याच्या पद्धती अस्या अनेक मुद्यावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन झाले. IIL चे श्री प्रतीक मोरे साहेब, ICL चे श्री निलेश निमसे साहेब, टोमॅटो एक्स्पर्ट अजित कोरडे, गणेश नाझीरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.